Mumbai-Thane : घोडबंदरच्या ट्रॅफिकला बाय बाय, मुंबई-ठाणे आणखी जवळ, अंतर २५ मिनिटांनी कमी

Ghodbunder Road Flyover To Cut Mumbai-Thane Drive By 25 Minutes : ठाण्यातील वाहतूककोंडीला थोड्याप्रमाणात ब्रेक लागणार आहे. मुंबई आणि ठाणे या प्रवासाचे वेळी कमी होणार आहे. कारण मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील भायंदरपाडा जंक्शन (Mumbai-Thane Bhaindarpada Flyover) येथे नव्याने बांधलेल्या चार लेनच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन झालेय. चार लेनच्या या उड्डाणपुलामुळे मुंबई आणि ठाणे शहरातील प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे. हा उड्डाणपूल मुंबईच्या उपनगरांपासून नवी मुंबई, नाशिक आणि गुजरातला जोडणाऱ्या रहदारीला गती देणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

हा प्रकल्प ठाणे क्षेत्रातील पहिला त्रिस्तरीय एकात्मिक वाहतूक जाळे प्रकल्प आहे. खालच्या स्तरावर महामार्ग, त्यावर उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो मार्गिका असेल. येत्या काही महिन्यांत मेट्रो सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांना या मार्गावरील मेट्रो स्थानकांपर्यंत सहज पोहोचता येईल. या उड्डाणपुलामुळे ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथोरिटी, बोरिवली, वसई-विरार आणि गुजरात येथील वाहतूक अधिक जलद होईल.

Pune ISIS Case: पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात २ दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई

या उड्डाणपुलामुळे ठाणे शहरातील आणि बाहेर जाणाऱ्या वाहतुकीचे विभाजन होईल. स्थानिक वाहने स्लिप रोड आणि अंडरपासचा वापर करतील. तर बाहेर जाणारी वाहने उड्डाणपुलावरून प्रवास करतील, ज्यामुळे सिग्नलवरील थांबण्याची गरज भासणार नाही. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाचा वापर कमी होईल आणि प्रवासाची कार्यक्षमता वाढेल, असे MMRDA आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले. हा उड्डाणपूल MMR मधील औद्योगिक आणि आर्थिक हालचालींना गती देणार आहे.

घोडबंदरमधील या रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही स्थानिक रहिवाशांसाठी आणि प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली होती. नव्या उड्डाणपुलामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, MMRDA ने MMR मधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणखी काही प्रकल्प हाती घेतले आहेत. वडाळा-कासारवडवली-गायमुख मेट्रो मार्गिका 4 आणि 4A लवकरच दहिसर मेट्रो लाईनशी जोडली जाईल, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. हा उड्डाणपूल MMRDA च्या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे. मुंबई आणि ठाणे यांच्यातील प्रवास अधिक सुलभ आणि जलद होईल. स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाचे स्वागत केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply