Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचे थैमान; पुढील ३-४ तास महत्वाचे, IMDकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

Mumbai Rain Update : महाराष्ट्रातील विविध भागात पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. मॉनसून सुरु झाल्यानंतर हवा तसा पाऊस पडला नव्हता. मात्र, आज गुरुवारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काही भागासह मुंबईतही ठिक-ठिकाणी पाऊस सुरु आहे. तसेच पुढील ३-४ तास मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागने नागरिकांना दिला आहे.

मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी भागात पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Weather Forecast : राज्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता; कोणकोणत्या भागात कोसळणार पाऊस?

गेल्या दोन तासांपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील ३-४ तास मुंबई शहर आणि उपनगरात तसेच ठाणे आणि रायगडच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात ऑरेंज अलर्ट जारी

दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणाच्या इतर भागातही मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply