Mumbai Rain : मुंबईची झाली तुंबई; शहरात पावसाचा जोर वाढला, पुढील तीन-चार तास महत्वाचे

Mumbai : मुंबईसह नजीकच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह कोकणातही पारवसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जोरदार पावसामुळे शहरातील काही ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत गेल्या तीन तासांपासून जोरदार पाऊस झाला आहे. पुढील तीन-चार तासांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. 

काल हवामान विभागाने ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार मुबंई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसहित अन्य भागात पाऊस कोसळत आहे.

मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत पावसाने सर्व महाराष्ट्र व्यापला आहे. हवामान विभागाने पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज, बुधवारी 'ऑरेंज अ‍ॅलर्ट' दिला आहे. पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे.

KDMC News : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर २७ गावातील ग्रामस्थांना मिळणार दिलासा; समिती गठीत करण्याबाबत निर्णय

मुंबईत जोरदार पावासाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे मुंबई महापालिकेने नागिरकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेने ट्विट करत नागरिकांना भरती-ओहोटीची माहिती दिली आहे.

'मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वररूपाचा पाऊस व काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्याता आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे. तसेच पालिकने भरती-ओहोटीची वेळ देखील दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply