
Mumbai Rain : शनिवारी मुंबई सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. तर पुढील 5 दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पहिल्याच पावसाने मुंबईची दैना झाली. कालच्या पावसाचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
तर भर पावसामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोड येथे जाऊन पाणी साचण्याच्या कारणे जाणून घेतली. तसेच येथील परिस्थितीची पाहणी केली. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले आहेत. आज जरी याठिकाणी पाणी नसले तरीही काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे इथे पाणी साचून हा परिसर जलमय झाल्यामुळे येथे अनेक वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली आहे.
तर यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, सकाळपासून मी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाची पाहणी करत आहे. सुरुवातीला मी वरळी पोस्टल रोडची पाहणी केली. त्या ठिकाणी काम कुठपर्यंत आले आहे. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते आहे का हे पाहून मी आता सांताक्रूझ मिलन सबवे या ठिकाणी आलेलो आहे.
या ठिकाणी दरवर्षी पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी व्हायची ती दिलेल्या सूचनांची पूर्तता केल्यानंतर आता वाहतूक सुरळीत रित्या सुरू आहे. ज्या ठिकाणी कामाची योग्य अंमलबजावणी होणार नाही त्या ठिकाणी निश्चित कारवाई करू मात्र प्रत्यक्षदर्शी तशी कुठलीही गोष्ट ही निदर्शनास आलेली नाही त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाहीये असं शिंदे म्हणालेत.
पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहील आहे. पावसाळ्यापूर्वी झालेल्या नालेसफाईवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. या भोंगळ कारभाराला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील प्रमुख नाल्यांची सफाईची पाहणी केली होती.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

