Railway News: भारतीय रेल्वेच्या विक्रम; यंदा ९१११ उन्हाळी विशेष ट्रेन!

Mumbai railway News: उन्हाळी सुट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने यंदा संपुर्ण देशात तब्बल ९१११ उन्हाळी ट्रेन चालविण्याचे ठरवीले आहे.पश्चिम रेल्वेवर सर्वाधिक १८७८ उन्हाळी विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये सूरत ,उधना स्थानकातून सर्वाधिक मजूर प्रवास करीत आहे.

उन्हाळी सुट्टीत नागरिक मोठया संख्येने आपल्या मूळ गावी जातात. गावी जाण्यासाठी प्रवासी रेल्वेला पहिली पसंती देतात. त्यामुळे प्रवाशांना गावी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण मिळत नाही. नियमित धावणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्या रिग्रेट झाल्या आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेकडून दरवर्षी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येतात.

Crime News : बीडसह मावळमध्ये बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर कारवाई, लाखाेंचा मुद्देमाल हस्तगत

गेल्या वर्षी २०२३ मध्ये उन्हाळी सुट्टीत ६३६९ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालिवण्यात आल्या होत्या.त्यातुलनेत यंदा उन्हाळी स्पेशल गाड्यांमध्ये वाढ झाली आहे. यंदा ९ हजार १११ उन्हाळी विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे.या गाड्या तामिळनाडू,महाराष्ट्र,गुजरात,ओड़िसा,पश्चिम बंगाल,बिहार,उत्तर प्रदेश,कर्नाटक,आंध्र प्रदेश, तेलंगणा,झारखंड,मध्य प्रदेश ,राजस्थान आणि दिल्लीतून या गाड्या चालविण्यात येत आहेत.

सर्वाधिक विशेष गाड्या पश्चिम रेल्वेवर

पश्चिम रेल्वेतर्फे १ हजार ८७८ उन्हाळी विषेश ट्रेन चालविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील सूरत आणि उधना स्थानकातून सर्वाधिक मजूर प्रवास करीत आहेत. साड्यांचे उत्पादन घेण्यात देशात सूरत पहिल्या क्रमांकावर आहे.परंतु एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून साड्यांच्या मागणीमध्ये घट झाल्याने मॅन्युफैक्चरिंग कमी झाले आहे. त्यामुळे कामगारांना आठवड्यातून फक्त तीन दिवस काम मिळत आहे. या कामगारांना दिवसाला पगार दिला जातो. त्यातून उदरनिर्वाह करणे कठिण असल्याने या कामगारांनी आपल्या मूळ गावी जाण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे सूरत आणि उधना स्थानकात मजूर,कामगारांची एकच गर्दी झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply