Pune : मुंबईहून पुण्याला जाताना आक्रीत घडलं, ४ तरूणांच्या कारचा चक्काचूर; भयंकर अपघात दोघांचा जागीच मृत्यू

Pune : पुण्यामध्ये आज पहाटे भयंकर अपघात झाला आहे. कारने पुढे असणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती, त्यावेळी काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार ट्रकला मागून जाऊन धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुंबई बेंगलोर हायवेवर आज पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. कारचा वेग इतका जास्त होता की पुढील भागाचा चक्काचूर झाला. कारमधील ४ जणापैकी दोघांचा अपघात दुर्देवी मृत्यु झाला. निहाल तांबोळी वय २०, हर्षवर्धन मिश्रा वय २२ हे देघे किरकोळ जखमी झाले आहेत. तर सिद्धांत आनंद वय २२, दिव्यराज सिंग राठोड वय २३ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा अपघातात मृत्यु झाला आहे.

अपघातामधील जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मयत दोन्ही तरूणाचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पिंपरी येथील Ycm रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस तसेच PCMC फायर फायटर यांच्या मदतीने वाहनामधील जखमी तसेच मयत यांना वाहनाचा काही भाग कापून वाहनाबाहेर काढण्यात आले. वास्तविक पहाता मागील दोन दिवसांपूर्वी अपघाताठिकाणी महार्गावर वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी पांढऱ्या पट्टया लावण्यात आल्या आहेत. पण याच पट्ट्या आता वाहन चालकांचा काळ बनत आहेत. आज पहाटे झालेल्या अपघाताला याच गतीरोधक पट्ट्या कारणीभूत असल्याचं काही नागरीकांचं म्हणणं आहे. पुढे जाणाऱ्या भरधाव वाहनाचा अचानक वेग कमी झाल्याने मागील वाहन धडकून अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *