Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; वाहन चालक जागीच ठार, 10 जखमी

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ बोरघाटात मध्यरात्रीच्या सुमारास खाजगी बसला हा अपघात  झाला. यामध्ये बस चालकाचा जागीच मृत्यू झालाय. तर १० प्रवासी या दुर्घटनेत जखमी झालेत. ही बस मुंबईहून पुण्याकडे निघाली होती. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विविध यंत्रणांनी बचावकार्य करत जखमींवर प्राथमिक उपचार केले. तसेच तातडीने जखमींना एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त बसमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
 
मुंबई पुणे-एक्सप्रेस वेवरील अपघाताच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अनेक चालक वाहनांची वेग मर्यादा ओलांडतात. त्यामुळे भीषण अपघाताच्या घटना घडतात. समृद्धीचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा मुंबई पुणे एक्सप्रेस वे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

शेकडो व्यक्तींनी गमावला जीव

मुंबई-पुणे महामार्गावर आजवर शेकडो व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. साल २०२२ मध्ये येथे ५४ हून अधिक अपघात झाले आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेला दिवे लावणे, वेगवेगळ्या दिशेची चिन्हे, सूचना फलक, सुरक्षा अडथळे, पादचारी रक्षक रेलिंग, क्रॉसरोड्सवर स्पीड हंप, रंबल स्ट्रिप्स इत्यादी सुविधा देण्यात आल्यात. मात्र तरी देखील अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply