Mumbai Pollution : मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ; समोर आली धक्कादायक माहिती

Mumbai Pollution : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्याचा हवामानाचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या महिन्यात संपूर्ण ३१ दिवस दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईच्या ठाणे, कल्याण, नवी मुंबई अशा काही शहरांमध्ये संपूर्ण महिनाभर हवा दूषित असल्याची नोंद करण्यात आली आहे. ( Mumbai Pollution)

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण ही चारही औद्योगिक क्षेत्र आहेत. रज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि क्रेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेच्या गुणवत्तेचा अहवाल जाहिर केला आहे. यासाठी वाहनांचा धूर, कचरा ज्वलन, बांधकाम अशा गोष्टींमुळे प्रदूषणात मोठी वाढ होताना दिसत आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक

मुंबई

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ०२ दिवस

साधारण प्रदूषण - १३ दिवस

जास्त प्रदूषण - १६ दिवस

धोकादायक प्रदूषण - ० दिवस

नवी मुंबई

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ०१ दिवस

साधारण प्रदूषण - १८ दिवस

जास्त प्रदूषण - १२ दिवस

धोकादायक प्रदूषण - ० दिवस

ठाणे

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ० दिवस

साधारण प्रदूषण - १४ दिवस

जास्त प्रदूषण - १३ दिवस

धोकादायक प्रदूषण - ०३ दिवस

कल्याण

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ० दिवस

साधारण प्रदूषण - २२ दिवस

जास्त प्रदूषण - ०९ दिवस

धोकादायक प्रदूषण - ० दिवस

मुंबई  ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या पैकी ठाणे शहारामध्ये हवेत जास्त प्रमाणात प्रदूषण आढळले आहे. ठाण्यात साधारण प्रदूषण १४ दिवस, जास्त प्रदूषण १३ दिवस आणि धोकादायक प्रदूषणाची तीन दिवस नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्यासाठी ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply