Mumbai Police : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या? कुटुंबाचा आरोप

Mumbai Police : मलाडमधील कुरार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. राहत्या घरात गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या का केली? आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय? याचा शोध सुरू आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबानं केला आहे.

कुरार पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस कर्मचारी यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी आपलं आयुष्य राहत्या घरात संपवलं आहे. सुभाष कांगणे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून, त्यांनी आत्महत्या का केली? याचा शोध सुरू आहे.

Pune Crime : पुण्यात हिरा व्यापाऱ्याचे अपहरण, पोलिस आणि गुन्हे शाखेकडून शोध सुरू

याप्रकरणी इतर पोलीस कर्मचारी अनेक अंदाज लावत आहेत. एका प्रकरणाच्या तपासाबाबत मानसिक छळाला कंटाळून कांगणे यांनी आत्महत्या केली. अशी शंका उपस्थित होत आहे. तर, पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबानं वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाने सुभाष कांगणे यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. डीसीपी स्मिता पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply