Mumbai News : जे.जे. रुग्णालयातील नेत्रतज्ञ्ज डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे;

Mumbai News: मुंबई प्रसिद्ध असलेल्या जे. जे. रुग्णालयातून मोठं वृत्त हाती आलं आहे. जे. जे. रुग्णालयातील ९ वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक त्यांच्या पदाचे राजनामे दिले आहेत. नेत्रतज्ञ्ज डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित ९ जणांनी राजीनामे दिले आहेत

जे. जे. रुग्णालयातील नऊ डॉक्टरांनी निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या छळाला कंटाळून दिले राजीनामे दिले आहेत. जे. जे. रुग्णालयातील अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याचा या डॉक्टरांचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयातील ९ डॉक्टरांचा तडकाफडकी राजीनामे देण्याचा प्रकार धक्कादायक मानला जात आहे.

डॉ.तात्याराव लहाने यांच्यासोबत डॉ.शशी कपूर, डॉ.दीपक भट,डॉ.सायली लहाने, डॉ.रागिणी पारेख, डॉ.प्रीतम सामंत, डॉ.स्वरांजित सिंग भट्टी, डॉ.आश्विन बाफना आणि डॉ.हमालिनी मेहता या 9 जणांनी आपले राजीनामे दिले आहेत.
 
जे. जे. रुग्णालयातील जेष्ठ डॉक्टरांनी एक परिपत्रक जारी करत राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. तसेच या परिपत्रकात राजीनाम्यामागील कारण स्पष्ट केलं आहे. जे. जे. रुग्णालयातील ९ डॉक्टरांनी राजीनामा देण्यामागे त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाचं कारण नमूद केलं आहे. या डॉक्टरांनी निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सेवानिवृत्तीनंतही काम करणारे तात्याराव लहाने यांचे वेतन अधिष्ठातांनी अदा केले नसल्याचे परिपत्रकात नमूद आहे. तसेच डॉ. लहाने यांना शासकीय निवासस्थान रिक्त करायला सांगून ७ लाख रुपये दंड ठोठावला, असेही परिपत्रकात नमूद आहे.

याचबरोबर निवासी डॉक्टरांना आमच्याविरोधात भडकवलं जात आहे, असं परिपत्रकात म्हटलं आहे. या निवासी डॉक्टरांना भडकवण्यात जे जे च्या डिन सहभागी असल्याचं तात्याराव लहाने यांनी म्हटलंय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply