Mumbai News : टरस्कॉच आईस्क्रिममध्ये मानवी बोट सापडलं, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

Mumbai News : मुंबईमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये मानवी बोट सापडलं सापडल्याची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसात या आईस्क्रीमची निर्मिती उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. गाझियाबादमधील लक्ष्मी आईस्क्रिम यांनी या आईस्क्रिमची निर्मिती केली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, मुंबईतल्या मालाडमधील ब्रँडन फेराओ नावाच्या व्यक्तीने झेप्टो या ऑनलाईन अॅवरून आईस्क्रिम मागितली होती. या आईस्क्रिममध्ये मानवी बोट आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्याने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची 91 कलमी बखर; दुर्मिळ बखरीतून उलगडणार शिवरायांचं चरित्र

मालाड पोलिसांनी याप्रकरणी यम्मो आईस्क्रिमविरोधातन्हा दाखल केला आहे. तसेच या मानवी बोटाचे अवशेष फॉरेन्सिंक तपासणीसाठी पाठवले होते. आता आईसस्क्रिममधलं बोट नेमकं कुणाचं आहे? गाझियाबादमध्ये तयार झालेली आईस्क्रिम मुंबईत डॉ. फेराओ यांच्या घरापर्यंत कशी पोहोचली, याचा पोलीस कसुन तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून खाद्य पदार्थांमध्ये झुरळ, उंदीर सापडण्याचे प्रकार समोर आले होते. परंतु आता मानवी बोटचं सापडल्यामुळे खूप चर्चा होत आहे.

डॉ. फेराओ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या बहिणीने झेप्टो अॅपवरून आईस्क्रिम मागवली होती. झेप्टोच्या मालाड पश्चिम येथील शाखेतून (Ice Cream) ती डॉ. फेराओ यांच्याकडे पाठवली गेली होती. त्यामुळे झेप्टोच्या मालाड शाखेची देखील चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बोटाच्या तुकड्याचा फॉरेन्सिक अहवालाची अजून प्रतिक्षा केली जात आहे. आता या प्रकरणाचं गाझियाबाद कनेक्शन समोर आल्याने पोलीस अधिकच अलर्ट मोडवर आले आहेत.

 
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply