Mumbai News : मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!

Mumbai News : ठाण्यानंतर आता दादर व मुंबईतहीवादळी वाऱ्याचे आगमन झाले असून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, वादळी सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई मेट्रोही ठप्प झाल्याची माहिती आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, वांगणी परिसरातही सोसाट्याचा वारा सुटला होता. या वाऱ्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांना आडोसा पाहिला, तर काहींनी आपले घर गाठले. मात्र, काही ठिकाणी पत्रे उडून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

मुंबईतील दादर, घाटकोपर परिसरातही वादळी वारं सुटलं असून हवामान ढगाळ झालं आहे. पुढील काही तासांत येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, वातावरण फिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. टॅक्सी, ऑटो व वाहनचालकांनीही जागेवर थांबा केल्याचं दिसून येत आहे. तर, दुसरीडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायवर बॅनर पडल्याने मुंबई मेट्रोचा खोळंबा झाला आहे. 

Pune News : पिंपरी चिंचवड : मतदान केंद्रावर गाेंधळ, उध्दव ठाकरे गटाच्या शहराध्यक्षाला अटक

मुंबई मेट्रो ठप्प

एअरपोर्ट रोड स्टेशनवरवर ही मेट्रो थांबली आहे, वादळी वाऱ्यामुळे बॅनर पडल्याने घाटकोपर-वर्सोवो मेट्रो ठप्प झाली. मेट्रो प्रशासनाकडून हा बॅनर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटकोपर येथून वर्सोवा मार्गावर धावणारी ही मेट्रो जागेवर थांबली आहे. त्यामुळे, प्रवाशी खोळंबले असून एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरच अडकून पडले आहेत.

विमानसेवेवरही परिणाम

विमानसेवेरही या वादळी वाऱ्याचा परिणाम झाला असून काही विमानांचे उड्डाण वळवण्यात आले असून वेळेतही बदल झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

लोकलसेवा विस्कळीत

मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेचे वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे, लोकल सेवेच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली असून पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.  मध्य रेल्वेवर ठिकठिकाणी स्पार्क झाल्याने लोकल अनेक ठिकाणी थांबून थांबून पुढे जात आहेत. तर मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हर हेड वायारचा खांब कोसळल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक बंद आहे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply