Mumbai News : मुंबईतील ३२,६५८ रिक्षा चालकांचे वाहन परवाने होणार निलंबित; मोठं कारण आलं समोर

Mumbai News : रिक्षाचालक अनेकदा प्रवाशांशी मुजोरीने वागतात, अरेरावी करतात. हे वागणं रिक्षाचालकांना चांगलंच महागात पडलं आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या ३,२६५८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भाडे नाकारणाऱ्या ३२६५८ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली 

जादा प्रवासी, भाडे नाकारणे आदी कारणांसाठी वाहतूक पोलिसांनी केली आहे. तसेच यापुढे ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे वाहतूक  विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.मुंबईतील रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानके तसेच इतर ठिकाणी लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात. तसेच जादा भाड्याची मागणी केली जाते. याबाबतच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे येत होत्या. त्याचबरोबर चालक गणवेश परिधान करीत नाहीत, बॅच तसेच इतर कागदपत्रे बाळगत नाहीत, नियमांचे उल्लंघन करतात अशाही तक्रारी येत होत्या.

Bus Fire : मुंबई- पुणे द्रृतगती मार्गावर मोठा अपघात टळला; टायर फुटला, प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली

या तक्रारींची गंभीर दखल घेत बेशिस्तचालकांना धडा शिकविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ८ एप्रिल ते २२ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली. तक्रारी आलेल्या सर्व ठिकाणी १५ दिवसांत वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले. रिक्षाचालक भाडे नाकारताना दिसल्यास त्याच ठिकाणी चालकावर कारवाई करण्यात येत होती. १५ दिवसांत ३,२६५८ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. विनागणवेश ५२६८, जादा प्रवासी वाहतूक करणे ८६५० व इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५६१३ अशा एकूण ५२१८९ इ -चलान कारवाई करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply