Mumbai News : पोट दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली, रिपोर्ट्सही नॉर्मल आले; मात्र ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले

Mumbai News : क्रॉफर्ड मार्केटमधील 45 वर्षीय महिला पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेली होती. तेव्हा त्या महिलेच्या पित्त नलिकेत 17 सेमी आकाराचा जिवंत अळी सापडली  आहे. या घटनेमुळे डॉक्टरांसहित सगळ्यांना धक्का बसला आहे. या अळीचं नाव अस्कारिस लुम्ब्रिकॉईड असून ती साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळते. प्रौढांमध्ये अतिशय दुर्मिळपणे ही अळी आढळल्याच्या घटना घडतात. 

मागील गुरुवारी या महिलेवर पित्ताशयातील खडा काढण्याची शस्त्रक्रिया पार पडली होती. डॉ.गजानन रोडगे यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर ही महिला पोटदुखीच्या कारणामुळे  हॉस्पीटलमध्ये पोहोचली. त्यामुळे तिच्या पोटात अन्नाचे कण किंवा पाण्याचे काही कण असल्याचा डॉक्टरांना अंदाज होता. त्यामुळे वेदना होत असाव्यात अशी शक्यता त्यांनी वर्तविली होती.

South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबई मतदारसंघात महायुतीचा नवा डाव; मिलिंद देवरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, मनसे फॅक्टर महत्त्वाचा

रुग्णावर उपचार करणारे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. गजानन रॉडगे यांनी सांगितलं की, तपासणी केल्यानंतर तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत. पित्तविषयक प्रणालीमध्ये बारीक कण असल्यासारखं काहीतरी दिसत  होतं. त्यामुळे वेदना होत असाव्यात असा अंदाज त्यांनी बांधला. त्यानंतर त्यांनी वेदना कमी होण्यासाठी पित्त नलिकाचा स्टेंट काढण्याची योजना आखली.

ऑपरेशन दरम्यान पित्त नलिकेत पांढरी नळीच्या आकाराची रचना दिसून आली, त्यामुळे संपूर्ण वैद्यकीय पथकाला आश्चर्य वाटले. ती नळी सारखी हालचाल करत होती, मागे पुढे सरकत  होता. त्यामुळे त्यांनी या कृमीला यशस्वीरित्या पित्त नलिकातून बाहेर काढले आणि वेगळे केले गेले.

डॉक्टरांनी सांगितलं की, ही अळी सुमारे 17 सेमी किंवा सुमारे 6.7 इंच लांबीचा आहे.  ही एक परजीवी अळी आहे. दरवर्षी एक अब्ज लोकं या अळीमुळे  आजारी पडतात. पित्त नलिकेच्या आत ही अळी जिवंत सापडणे ही एक असामान्य गोष्ट आहे. डॉक्टरांनी या महिलेच्या कुटुंबाला जंतनाशक औषधे लिहून दिली आहेत. या महिलेवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply