Mumbai : फिरायला गेले अन् खदानीत बुडाले; एकाचा मृतदेह सापडला तर दुसरा बेपत्ता, दहिसर पूर्वेकडील घटना

Mumbai : मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील हनुमान टेकडी येथील खदानीतील पाण्यात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे. यापैकी एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाचा मृतदेह काढला बाहेर आहे. तर या खदानित बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. मनोज रामचंद्र सुर्वे (45 वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर चिंतामण वारंग या तरुणाचा अद्याप शोध सुरू आहे.

Raigad Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; लेन बदलताना टॅंकर कोलमडला, ट्रक आणि कारला धडक, १ ठार

दहिसर पूर्वेकडील हनुमान टेकडी येथील खदानीत हे दोन तरूण बुडाले आहेत. एका तरूणाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसरा अद्यापही बेपत्ता आहे. बेपत्ता तरूणाचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. काल सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास ही घटना घडली आहे. हे तरूण फिरण्यासाठी खदानीवर गेल्याची माहिती मिळत आहे.

तरूणांना खदानीच्या परिसरात फिरायला गेल्यानंतर ते बुडाल्याची घटना घडली आहे.त्यांना फिरायला जाणं महागात पडलं आहे. या दोन तरूणांपैकी एका तरूणाचा मृतदेह सापडला आहे. दहिसर पूर्वेकडील परिसरात ही घटना घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *