Mumbai News : तीन महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण करुन हत्यारप्रकरणी तृतीयपंथीयाला फाशी; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल

Mumbai News : तीन महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण करुन अत्याचार करत हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी तृतीयपंथीयाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. २०२१ मध्ये कफ परेड भागात तृतीयपंथीयाने हे संतापजनक कृत्य केलं होतं. पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अदिती कदम यांनी ही शिक्षा सुनावली.

आरोपीने बाळावर अत्याचार करुन हत्या करत पुरावे नष्ट करण्यासाठी बाळाला खाडीत फेकलं होतं. अत्यंत वाईट अशी ही घटना असल्याचं न्यायाधीशांनी निकाल देताना सांगितले. विशेष सरकारी वकील राकेश तिवारी यांनी हा खटला दुर्मिळ असल्याचं म्हणत फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. 

BJP News : भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे अनेक ठोस पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. एका साक्षीदाराने देखील आरोपीला चिमुकलीला घेऊन जाताना पाहिले होते. ज्यामुळे आरोपीनेच चिमुकलीचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली, असं सरकारी वकील राकेश तिवारी यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं.

पोलिसांनी तृतीयपंथी आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 376 (बी, डी), 363 201,34 आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. आरोपीला अटक केल्यापासून तुरुंगातच आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply