Mumbai News : वेळ लागला तरी चालेल, पण अन्याय व्हायला नको, अध्यक्ष लवकरच शेड्यूल जाहीर करणार; संजय शिरसाट यांची माहिती

मुंबई- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या 22 याचिका तर शिंदे गटाच्या 12 याचिका त्यांच्यासमोर आहेत. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १३ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद नार्वेकरांनी ऐकला. अध्यक्षांनी आपला निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती, संजय शिरसाट यांनी दिली आहे.

पुढे शेड्यूल्ड प्रमाणे सुनावणी घेतली जाईल अशी माहिती शिरसाट यांनी दिली. वेगवेगळ्या सुनावणी करण्यास ठाकरे गटाचा विरोध होता. पण, नार्वेकरांनी याला नकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच सुनावणी होईल. पुढे सुनावणी कशी घ्यायची यावर आज विचार झाला, असं ते म्हणाले.

MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणात पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला; एकत्रित सुनावणीवर निर्णय नाहीच

दोन तीन दिवसात अध्यक्ष याप्रकरणात आँर्डर काढतील. १३ तारखेला एकत्र सुनावणी घ्यायची की नाही ते ठरवलं जाईल. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद सादर केला. अध्यक्षांनी आपला निर्णय राखून ठेवलाय, असं शिरसाठ म्हणाले. तसेच लाईव्ह सुनावणी घेण्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केल्याचं ते म्हणाले.

दोन्ही गटांना आणखी माहिती द्यायची आहे. पण, पुढील सुनावणी कशी घ्यायची यासाठी एक शेड्यूल तयार करणार असल्याचं अध्यक्ष म्हणाले आहेत. त्यानुसार ते लवकरच शेड्यूल जाहीर करतील, असं शिरसाट म्हणाले. प्रत्येक प्रकरणाची सुनावणी व्हायला हवी, कोणावर अन्याय होऊ नये. यासाठी वेळ लागला तरी चालेल, अशी अध्यक्षांची भूमिका आहे. त्यामुळे याप्रकरणावर निर्णय व्हायला चार ते पाच महिने वेळ लागणार असल्याचं बोललं जातं. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply