Mumbai Loksabha Voting : ओशिवरामध्ये भाजप-ठाकरे गट आमनेसामने, मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप

Mumbai Loksabha Voting : मुंबईतल्या ओशिवरामध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. याठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आमदार भारती लवेकर आणि भाजपच्या नेत्या दिव्या ढोले हे मतदारांशी संवाद साधत त्यांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि भारती लवेकर, दिव्या ढोले यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाहेर काढले.

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत आमदार भारतीय लवेकर आणि दिव्या ढोले यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप केला. या दोघी देखील गेल्या तासाभरापासून मतदारांना कन्व्हेंस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या सर्व गोंधळानंतर या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून दिव्या ढोले आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मतदान केंद्राबाहेर काढले.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply