Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी मोठी अपडेट; रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल!

Mumbai Local Train : मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायरच्या देखभाल-दुरूस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत काही लोकलसेवा उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. 

Mumbai News : टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग; तरुणाचं धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

ब्लॉक कालावधीत बोरिवली-गोरेगावदरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच काही लोकलसेवा रद्द राहतील. ब्लॉकदरम्यान अंधेरी आणि बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावरून चालविण्यात येईल. 

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील पायाभूत कामांसाठी १९, २० आणि २१ एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसा मध्य आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल.

पॉवर ब्लॉकमुळे सीएसएमटी स्थानकातून रात्रीची शेवटची लोकल १२.१४ वाजता सुटेल. या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बरवरील वडाळा या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. तसेच लांबच्या पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही स्थगित असेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply