Mumbai Local : ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प, तुर्भे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे प्रचंड हाल

Mumbai Local : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकादरम्यान गर्डर वाकला आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेल मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ९ आणि १० यावरून अद्याप एकही लोकल वाशी आणि पनवेलच्या दिशेने रवाना झालेली नाही. त्यामुळे या मार्गावरील सर्वच स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातून नवी मुंबई या ठिकाणी जाणारी रेल्वेसेवा गेल्या तासाभरापासून ठप्प झाली आहे. एमएमआरडीएच्या वतीने मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. परंतू हे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्याचा फटका आता रेल्वे प्रवाशांना बसत आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने काम सुरू आहे. थोड्याच वेळात लोकलसेवा सुरू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सांगितले की, 'ठाणे आणि ऐरोली दरम्यान गर्डर लावण्यासाठी एमएमआरडीएने ट्रान्स हार्बर लाईनवर मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला होता. हे गर्डर लावताना ते वाकले गेले. त्यामुळे सकाळी ७:१० वाजल्यापासून ट्रान्स हार्बरवरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे.'

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे नवी मुंबईकडे कामासाठी जाणारे प्रवासी आणि ठाण्याकडे कामासाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. ठाण्याकडून नवी मुंबईकडे जाणारे प्रवासी आता मध्य रेल्वे मार्गावरून कुर्ला रेल्वे स्थानकावर येऊन पुढे पनवेलला जात आहेत. तर ठाण्याकडे येणाऱ्या प्रवाशांना कुर्ला मार्गे ठाण्यात जावे लागत आहे. यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर गर्दी झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply