Mumbai Local : रविवारी मुंबईकरांचा प्रवासाचा खोळंबा, लोकल मोटरमन संपाच्या तयारीत

Mumbai Local : मुंबईतील मध्य रेल्वे विभागातील मोटरमन पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सध्या रिक्त पदांमुळे कार्यरत मोटरमनवर अतिरिक्त कामाचा भार येत आहे. या अतिरिक्त भारामुळे मोटरमनला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच ताणाचा निषेध म्हणून मध्य रेल्वेतील मोटरमन चार मेपासून जादा काम न करण्याच्या भूमिकेत जाणार आहेत.

मध्य रेल्वेतील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदांमुळे सध्या कार्यरत मोटरमनवर अतिरिक्त कामाचा भार येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण होत असून, याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच सेवांवर होत आहे. याच पार्श्वभूमीवर, मोटरमन वर्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune : पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात, मर्सिडीजनं दुचाकीला उडवलं; घटनास्थळावरील फोटो पाहुन उडेल थरकाप | Pune Accident

मोटरमन संघटनांनी ४ मेपासून "नो एक्स्ट्रा वर्क" आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्त पदे तात्काळ भरावीत आणि प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्यात, यासाठी मोटरमन आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाचा मोठा फटका मुंबई लोकल सेवेवर बसण्याची शक्यता आहे.

जादा ड्युटीवर आधारित असलेल्या अनेक लोकल फेऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. परिणामी प्रवाशांना वेळेवर लोकल सेवा उपलब्ध न होणे, गोंधळ आणि विलंब यांना सामोरे जावे लागू शकते. रेल्वे प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी मोटरमन संघटनांकडून करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply