Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Mumbai Local : गेल्या आठवड्यात लोकलच्या गर्दीमुळे तिघां प्रवाशांचा बळी गेल्यामुळे लोकल गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या घटनेची दखल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी घेतली आहे. लोकल गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे बोर्डाला पत्र पाठविणार असल्याची माहिती राम करण यादव यांनी दिली आहे.गेल्या सात दिवसांत डोंबिवली ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल खाली पडून तिघा प्रवाशांच्या जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या दारवाजानजीक उभे राहिलेल्या अवधेश दुबे, रिया राजगोर आणि राहुल अष्टेकर यांचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता. डोंबिवली ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान घटना घडल्या. दोन रेल्वे अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तर तिसऱ्या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीचा लोकल प्रवास आता दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत जात आहे.

Sharad Pawar : शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

या घडलेल्या घटनेची दखल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी घेतली आहे. लोकलच्या गर्दी विभाजण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही रेल्वे बोर्डाला पत्र लिहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी दिली आहे.

मुंबईतील लोकलला इतकी गर्दी असते की लोकल डब्यातील सीट मोजक्या प्रवाशांच्या नशिबात येत असते. त्यामुळे सीटवर बसलेल्या प्रवाशांपेक्षा उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. पण कामावर वेळते पोहोचण्याची गडबड आणि ट्राफीक टाळण्यासाठी लोकल पकडली जाते. त्यातही कमी पैशात प्रवास करता येतो. त्यामुळे प्रचंड गर्दी होत असते. याचा फक्त आजारी, वयोवृद्ध, महिला यांनाच त्रास होतं असं नाही, तर चांगल्या धडधाकट व्यक्तीला तरुणांनांही हा प्रवास तापदायक असतो. तरीही पोटासाठी जीवघेणा प्रवास लोक करत असतात.

आता एकामागोमाग अपघात झाल्यामुळे रेल्वे प्रशासन जागं झालंय खरं, पण लोकलची गर्दी कशी टाळणार आणि प्रवाशांना कमी पैशात सुरक्षित प्रवासाची सोय कशी करणार, हे पहावं लागणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply