Mumbai Local : हार्बर मार्गावरील खारकोपर येथे लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; जीवितहानी नाही

हार्बर रेल्वे मार्गावरील मोठी दुर्घटना आज टळली. बेलापूर ते खारकोपर लोकलचे ३ डबे खारकोपर स्थानकात रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ८.४६ सुमारास ही घटना घडली. या अपघातात सुदैवाने प्रवाशांना कसलीही इजा झालेली नाही. घटनास्थळी मदतीसाठी बचाव पथकाची वाहने दाखल झाली असून डबे रुळावर आणण्यासाठीचे आणि लोकल पूर्वपदावर आण्यासाठी काम सुरू आहे.

या घटनेमुळे बेलापूर-खारकोपर-नेरुळ या मार्गावरील लोकलवरती परिणाम झाला आहे. हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. लोकल पूर्वपदावर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हार्बर मार्गावरील इतर गाड्या वेळापत्रकानुसार धावत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली ट्विट करून दिली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डब्बे रुळावर ठेवण्याचे काम सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *