Mumbai Hospitals Threat Mail : मुंबईतील ६० हॉस्पिटलला धमकीचे ईमेल; पोलिसांची धावपळ, डॉक्टरांसह पेशंट धास्तावले

 

Mumbai Hospitals Threat Mail : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमधील ६० हॉस्पिटलला धमकीचे मेलआले आहेत. यापूर्वी मीरा-भाईंदर येथील हॉस्पिटलला धमकीचा मेल आला होता. त्यानंतर अशाच पद्धतीचा धमकीचा मेल मुंबईतील ६० नामांकित हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या सर्व हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी धाव घेतली असून पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. हे धमकीचे मेल नेमके कुठून आले, कोणी पाठवले, दहशतवादी संघटनांनी तर पाठवले नाही ना? सर्व बाजूने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या धमकीचमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Pune Tragedy : एकाच कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू; ती काही मिनिटं आणि पती-पत्नी, मुलासोबत घडलं भयंकर

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९.३० ते १० च्या सुमारास मीरारोडच्या वॉकार्ड हॉस्पिटलला धमकीचा मेल आला होता. त्यानंतर आता मुंबईतील ६० हॉस्पिटला धमकीचा मेल आले आहेत. हे सर्व मुंबईतील मोठे आणि नामांकित हॉस्पिटल्स आहेत. रुग्णालयात स्फोटकं असल्याची माहिती या धमकीच्या मेलद्वारे देण्यात आली आहे. श्वान पथकासह पोलिसांनी या हॉस्पिटल्समध्ये धाव घेतली असून त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. धमकीचा मेल आल्याची पुष्टी पोलिसांनी दिली आहे.
 
दरम्यान, मीरारोडच्या वॉकार्ड हॉस्पिटलमध्ये स्पोटक असल्याचा धमकीचा मेल पाठवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. मीरा-भाईंदर आणि वसई -विरार पोलिसांना ईमेलवरून ही माहिती देण्यात आली. धमकीचा मेल येताच मीरा भाईंदर पोलिसांनी वॉकार्ड हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सध्या रुग्णालयामध्ये भीतीचे वातावरण आहे.

श्वान पथकासह पोलिसांच्या इतर पथकाकडून हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. या मेलमुळे एकच खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने पोलिस हॉस्पिटल परिसरात आले आहेत. हॉस्पिटलमधील रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply