Mumbai High : मोठी बातमी! मुंबई High Court बॉम्बने उडवण्याची धमकी, परिसरात एकच खळबळ

Mumbai High Court bomb threat latest news : राजधानी दिल्लीतील हायकोर्टानंतर मुंबईतील हायकोर्टही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा ईमेल मिळताच हायकोर्टात पोलीस दाखल झाले आहेत. बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी कऱण्यात येत आहे. धमकी मिळाल्यानंतर तात्काळ मुंबईतील हायकोर्टात असणाऱ्या सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि इतर लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळताच कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू असून परिसर रिकामा करण्यात आला आहे. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

बॉम्बे हायकोर्टाला धमकी मिळाल्यानंतर पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. बार अॅण्ड बेंचच्या रिपोर्ट्सनुसार, बॉम्बेची धमकी मिळताच गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याशिवाय पोलिसांकडून हायकोर्ट परिसर खाली करण्यात आला आहे. बॉम्बने उडवून देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. परिसरात बॉम्ब शोधक पथकाकडून तपास करण्यात येत आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

दिल्ली हायकोर्ट उडवण्याचीही धमकी

राजधानी दिल्लीमधील हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल दिल्ली पोलिसांना मिळाला होता. हायकोर्टामध्ये तीन बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेल आला होता. त्यानंतर तात्काळ हायकोर्ट खाली करण्यात आले होते. पोलिसांकडून तात्काळ उपाययोजना करत तापस सुरू करण्यात आला. हायकोर्टमधील न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आलेय. दिल्ली पोलिसांकडून याबाबतचा तपास सुरू करण्यात येतोय.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *