Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर टँकरचा अपघात; सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुक थांबवली

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर दासगाव येथे रसायनाने भरलेला टँकर उलटला त्यामुळे महामार्गावर तब्बल दाेन किलाेमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर दासगाव गाव हद्दीत रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला दासगाव जवळ अपघात झाला. या टँकरमध्ये ज्वालाग्राही रसायन हाेते. हे रसायन रस्त्यावर पडले. त्यामुळे पाण्याचा टॅंकर मागविण्यात आला.

यावेळी महामार्गवारील वाहतुक पुर्णत: थांबविण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव टँकरवर पाणी मारून मदत कार्य करण्यात आले. हा टँकर मुंबईहून महाड  एमआयडीसीकडे निघाला होता. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *