Mumbai-Goa Highway : निवळी घाटात दरड कोसळली, मुंबई -गोवा महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रत्नागिरीतील निवळी घाटामध्ये  दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे

मिळालेल्या माहितीनुसार,मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटामध्ये आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आले आहेत. दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील दोन्ही मार्गीकेवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रत्नागिरीवरुन मुंबईच्या दिशेला येणाऱ्या आणि मुंबईवरुन गोव्याच्या दिशेला जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा ब्लॉक; दुपारी १२ ते २' या वेळेत पुर्णतहा राहणार बंद

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटामध्ये दोन्ही मार्गीकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकाच ठिकाणी वाहनं अडकल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मोठे ट्रक, टँकर आणि कार त्याचसोबत छोटी वाहनं घाटामध्ये उभी राहिली आहेत.महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जेसीबीच्या सहाय्याने मातीचे ढिगारे हटवण्याचे काम सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply