Mumbai Fire : मुंबईच्या चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; घराला लागलेल्या आगीत महिला होरपळली

Mumbai : मुंबईच्या चेंबूर वाशिनाका येथे एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीली एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अडकलेल्या ६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यशं आलं आङे. तर एक महिला होरपळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चेंबूर वाशीनाका येथील एका म्हाडाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घराला आग लागली. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर घरात ६ जण अडकले होते. त्या ६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तर या आगीत एक महिला होरपळून महिला जखमी झाली आहे.

आग लागल्यानंतर काही वेळातच आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ राजेशकुमार घाटे आणि अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचाचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. तसेच त्यांच्याकडून आगीत अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.

विक्रोळीत टेम्पो लावण्याच्या वादावरून एकाची मृत्यू

विक्रोळी पार्कसाईट येथे टेम्पो लावण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विक्रोळी पार्कसाईट पोलीस करत आहेत.

८ वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

घाटकोपरच्या शांतीसागर सोसायटीच्या जुन्या पाण्याच्या टाकीमध्ये पडून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीत बुडाल्यानंतर नागरिकांनी त्याला तात्काळ बाहेर काढले. तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याच्या वडिलांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. या प्रकरणाची कारवाई पोलिसांकडून केली जात आहे. सचिन जनबहादूर वर्मा असे मृत मुलाचे नाव आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply