Mumbai Fire News : मुंबईच्या लोअर परळमधील इमारतीला भीषण आग, ४ अग्निबंब घटनास्थळी

Mumbai Fire News : मुंबईतील लोअर परळ एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या गाळ्याला सोमवारी दुपारी ही आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परळ येथील शाह अँड नाहर इंडस्ट्रीजला आग लागल्याची घटना घडली आहे. शाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्याा एका गाळ्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ४ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवानांनी पोहोचल्यानंतर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
 

मुंबईतील लोअर परळच्या शाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्या एका गाळ्याला आग लागली. आग लागल्यानंतर इमारतमधील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. गाळयाला आग लागल्यानंतर इमारतीमधील लोक खाली उतरले. तर घटनास्थळी देखील बघ्यांची गर्दी झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी आग विझविण्यासाठी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले.

 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply