Mumbai : कम्प्युटरमध्ये तांत्रिक अडचणी सांगून फसवणूक, मुंबईत बसून अमेरिकन नागरिकांना गंडवलं; मुंबईत खळबळ

Mumbai : संगणकातील मायक्रोसॉफ्ट ॲप्लीकेशनमधील तांत्रिक अडचण दूर करण्याच्या नावाने अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस टोळीला अटक केली आहे. बोरिवली पश्चिम परिसरात वजीरा नाकाजवळ बोगस कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना त्यांच्या कम्प्युटरमध्ये काही दुरुस्ती आणि अडचणी आहे का? असा संपर्क साधून त्यांचा बँकेचे डिटेल्स घेऊन त्यांची फसवणूक केली जात होती.

Pune : छावा बघायला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले, मकोका गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

या बोगस कॉल सेंटरची माहिती मुंबई गुन्हे शाखा युनिट १२ला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून ६ लॅपटॉप, २० मोबाईल, २ राऊटरसोबत २ लाख ४१ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपींच्या या टोळीकडून मुंबई शहरात आणखी कुठल्या ठिकाणी बोगस कॉल सेंटर चालवून नागरिकांची फसवणूक केली आहे का? या टोळीमध्ये आणखी कोण सदस्य आहेत का? या संदर्भात मुंबई गुन्हे शाखा युनिट १२ कडून पुढील तपास केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply