Mumbai Crime News : शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय चिमुकलीवर क्लासरुममध्येच अत्याचार; मालाडमधील घटनेने खळबळ, आरोपी अटकेत

Mumbai Crime News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेच्याच वॉचमनने लैगिंग अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथील ही धक्कादायक घटना आहे. आरोपी वॉचमनला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अन्सारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळच्या सुमारात आरोपी मोहम्मद अन्सारीने संधी साधून मुलीवर अत्याचार केला. १९ डिसेंबरच्या सकाळी ९ ते १२ दरम्यान ही घटना घडली. अल्पवयीन मुलीला एका क्लासरुममध्ये नेऊन हे गैरकृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. 

Bus Accident News : सहलीला निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू, ५ ते ६ विद्यार्थी जखमी

घटनेनंतर वेदना असह्य झाल्याने मुलगी रडत होती. मुलीच्या पालकांनी तिच्या रडण्याचं कारण विचारलं. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यावेळी घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पालकांनी त्यानंतर मालाडच्या मालवणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीवरुन आरोपी मोहम्मद अन्सारी विरोधात ३७६, ३५४, भादवी कलमांतर ४, ८, १२ पोस्को अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *