Mumbai Crime : मुंबई विमानतळावर कोट्यवधीचे सोने जप्त; 2 परदेशी अटकेत

मुंबई : एकूण 8 प्रकरणांमध्ये कारवाई करत सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर 4.75 कोटी रुपयांचे 9.5 किलो सोने जप्त केले आहे. 27 आणि 28 जानेवारी रोजी दरम्यान या कारवाया करण्यात आल्याची माहिती आहे.

अटक करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी दोन प्रवाशाना सहा किलो सोन्यासह दुबईतून पकडण्यात आले होते, ज्याची एकूण बाजारातील किंमत 2.99 कोटी रुपये आहे. हे दोघे अझरबैजान देशाचे नागरिक आहेत. प्रवासात सोने या प्रवाशांनी आपल्या बॅगेत लपवले होते. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

23 जानेवारीला मुंबई विमानतळावरही असाच एक प्रकार समोर आला होता. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने दोन परदेशी नागरिकांना अटक केली. या दोघांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. परकीय चलनाची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. एका परदेशी नागरिकाने पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी चलन लपवले होते. चलनाची किंमत 90,000 अमेरिकन डॉलर्स होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply