Mumbai Crime : मुंबईत आईनेच पोटच्या मुलाचा गळा आवळला, धक्कादायक कारण आलं समोर

Mumbai : मुंबईच्या वांद्रे भागातील खेरवाडी वाय कॉलनीत गुरुवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. ३६ वर्षीय अभिलाषा औटी यांनी आपल्या १० वर्षीय मुलगा सर्वेशची हत्या केली. अभिलाषा यांना स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचा त्रास होता. हा आजार रुग्णाला अतिशय आक्रमक किंवा अतिप्रेमळ बनवतो. याच मानसिक अवस्थेत त्यांनी वायरने गळा आवळून सर्वेशचा जीव घेतला.

ही घटना समजताच परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. खेरवाडी परिसरातील नागरिक या घटनेने हादरले असून, कुटुंबियांसाठी ही वेळ अत्यंत दु:खद ठरली आहे.

Pune : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप

अभिलाषा यांना स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचा त्रास असल्याने त्यांच्या मानसिक स्थितीत अस्थिरता होती. घटनेच्या वेळी घरात सर्वेश आणि अभिलाषा एकटेच होते. राग अनावर झाल्याने अभिलाषा यांनी सर्वेशला बेडरूममध्ये नेऊन दरवाजा बंद केला आणि एका वायरने त्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. सर्वेशचे वडील हे उप-सचिव पदावर कार्यरत असून, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अभिलाषा यांच्या मानसिक आरोग्याचा प्रभाव या घटनेला कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे.

खेरवाडी येथील दुर्दैवी घटनेनंतर सर्वेशचे वडील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अभिलाषा औटी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली आहे. अभिलाषा यांचे पती हे सरकारी सेवेत उप-सचिव पदावर कार्यरत असून, या घटनेमुळे ते अत्यंत खचले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अभिलाषा यांच्या मानसिक स्थितीचा परिणाम या घटनेला कारणीभूत ठरल्याचे समोर येत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे खेरवाडी परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून, रुग्णांना भास होणे, विसंगत विचार येणे आणि बुद्धीभ्रंशाचा त्रास होतो. यामुळे त्यांचे वर्तन सामान्य राहात नाही. दैनंदिन कामे करणेही त्यांना कठीण जाते. हा आजार रुग्णांच्या मानसिक स्थैर्यावर परिणाम करतो, ज्यामुळे त्यांच्या व्यवहारात असामान्य बदल दिसून येतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply