Mumbai Coastal Car Accident : भरधाव कार डिव्हायडवर आदळल्याने उलटली, पती-पत्नी गंभीर जखमी; मुंबईत भीषण अपघात

Mumbai : मुंबईतील कोस्टल रोडवरील हाजीअली परिसरात रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला आहे. वेगात असलेली स्विफ्ट कार दुभाजकावर आदळून पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात कारमधील पती आणि पत्नी जखमी झाले असून, दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास, कोस्टल रोडवरील हाजीअली परिसरातील मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली. स्विफ्ट कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुभाजकावर आदळली. धडकेनंतर कार पलटी होऊन रस्त्यावरच उलटली. अपघाताची तीव्रता इतकी होती गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ

अपघातात गंभीर जखमी झालेले पती-पत्नी सध्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत. कार चालवत असलेला तरुण किरकोळ जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. गाडीचा वेग खूप जास्त असल्याने हा अपघात झाला आहे. दारूच्या नशेत गाडी चालवली जात होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply