Mumbai Breaking News : मुंबईत पुन्हा साखळी बॉम्बस्फोटाची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर, नेमकं काय घडलं?

Mumbai Breaking News : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी (२ फेब्रुवारी) पुन्हा एकदा धमकीचा मॅसेज आला. मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी मॅसेज करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने दिली. मुंबई पोलिसांनी या कॉलची गंभीर दखल घेतली असून हा मॅसेज नेमका कुठून आला, तो कोणी केला याचा केला जात आहे. 

मुंबई पोलिसांना अशी धमकी मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील पोलिसांना असे अनेक फोन आले असून त्याद्वारे धमक्या देण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज केला. 

Pune Crime News : पत्नीच्या नावावर कर्ज काढून मित्राला देणं जिवावर बेतलं; पैसे परत मागताच बांबूने बेदम मारहाण

मुंबईत मोठा घातपात घडवणार असून आम्ही ६ ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने मॅसेजमध्ये म्हटलं. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या मॅसेजची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी मॅसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन शोधण्यास सुरुवात केली आहे.

कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन देखील मुंबई पोलिसांनी केले आहे. यापूर्वीही मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन तसेच मॅसेज आले आहेत. काही दिवसांपूर्वीमुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता.

यंत्रणांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचे लोकेशन शोधून काढले होते.पोलिसांनी तपास केला असता, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे निष्पन्न झालं होतं. त्याने दिलेल्या माहितीत काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट झालं होतं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply