Mumbai Best Bus Accident : मुंबईत भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवलं; अपघातात ३ जणांचा मृत्यू

Mumbai : मुंबईच्या कुर्ल्यातून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या कुर्ला एलबीएस रोडवर सोमवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. या रोडवर भरधाव बेस्ट बसने रोडवरील अनेकांना उडवले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस रोडवर ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भरधाव बेस्ट बस अनेकांना धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Fire : बावधन परिसरातील दुकानाला भीषण आग, हवेत दूरवर पसरले धुरांचे लोट

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट क्रमांक ३३२ ही बस कुर्ला येथून अंधेरीकडे जात होती. त्याचवेळी बेस्ट बसचा ब्रेक फेल होऊन बुद्ध कॉलनीजवळील आंबडेकर नगर येथे हा अपघात झाला आहे.

कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथील बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या १० ते १२ जणांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातील जखमींना सायन आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

३२२ क्रमांकाच्या भरधाव बेस्ट बसने धडक रस्त्यावरून चालणाऱ्या धडक दिली. या वेळी रस्त्यावर चालणाऱ्या १० ते १२ लोकांना बसने चिरडलं. बेस्ट बसच्या धडकेत रिक्षा चक्काचूर झाली आहे. या भीषण अपघातानंतर लोकांची घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. या अपघातानंतर काही संतप्त लोकांनी बेस्ट बसची तोडफोड केली. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply