Mumbai Accident : मुंबईत भीषण अपघात; भरधाव ट्रकची ४ दुचाकींना धडक, वाहनांचा अक्षरश: चक्काचूर

Mumbai : मुंबईतून भीषण अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे. मुंबईतील बीकेसी उड्डाणाजवळून कुर्ल्याकडे जाणाऱ्या मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या ट्रकने रस्त्यावरील तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एवरार्ड नगर येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. एवरार्ड नगर आडीएमआय गेट समोरील हायवेजवळील बीकेसी उड्डानाजवळून कुर्लाकडे जाणाऱ्या मार्गावर मिक्सर ट्रकने ३ ते चार दुचाकींना मागून धडक दिली.

या भीषणअपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना सायन रुग्णालयात दाखल केले आहेत. या भीषण अपघातात वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर मिक्सर ट्रकचा चालक पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातानंतर रस्त्यावरील बघ्यांची गर्दी जमल्याचंही पाहायला मिळालं.

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावरही अपघाताची घटना घडली. काल रात्री मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघाजवळील खडवली फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply