Mumbai Crime : भयंकर! ७ जणांची हत्या, दोघांचा मृतदेह नाल्यात फेकला; आरोपीच्या दाव्याने पोलिसांची उडाली झोप

 

Mumbai : वडाळ्यात १२ वर्षीय मुलाची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलीस चौकशीत आरोपीने खळबळजनक दावा केला आहे. आरोपीने १२ वर्षीय मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीने ७ जणांचा हत्या केल्याचा दावा केला आहे. आरोपीच्या दाव्यानंतर पोलिसांची झोप उडाली आहे.

वडाळ्यात १२ वर्षीय मुलाच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने आणखी सात जणांची हत्या केल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे. कोव्हिड काळात पॅरोलवर बाहेर आल्यानंतर बिपुल शिकारीने मुंबईत साथीदार राजू मंडल आणि दुसऱ्या एका १२ वर्षीय मुलाच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपी बिपुलने दोघांचे मृतदेह भक्ती पार्क येथील नाल्यात फेकल्याचा शिकारीने केला आहे. शिकारीने दावा केल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह शोधण्यास सुरुवात केली आहे.

Solapur : सोलापुरात तोतया डॉक्टरवर महापालिका प्रशासनाची कारवाई, जिल्ह्यात २५० तोतया डॉक्टर असण्याचा अंदाज

काय आहे प्रकरण?

पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपी बिपुलने २८ जानेवारीला वडाळ्यातील १२ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बिपुलला ताब्यात घेतलं होतं. पुढे बिपुलने पोलिसांच्या हाताला तुरी देत पळ काढला होता. आरोपी बिपुल आठ महिने पोलिसांना गुंगारा देत होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी बिपुलला दिल्लीवरून अटक केली आहे.

दरम्यान, बिपुलने २०१२ साली कोलकाता येथे स्वतःच्या पत्नी आणि २ वर्षीय सावत्र मुलीची हत्या केली होती. याच पत्नीच्या हत्येप्रकरणी बिपुल जन्मठेपाची शिक्षा भोगत होता. पुढे कोव्हिड काळात पॅरोलवर बाहेर येताच बिपुल फरार झाला होता. आता आरोपीने मुंबईत दोघांच्या हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याने हत्या केल्यानंतर मृतदेह नाल्यात फेकल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply