Mumbai : "कोणीतरी हे रचलेले! मुलींना स्वच्छतागृहात नेण्यासाठी तीन बाई होत्या...; बदलापूर प्रकरणाला वेगळं वळण, सनसनाटी दावा!

Police Inquiry Demanded, Brother Emphasizes Innocence  : बदलापूरमधील एका शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील आरोपी, सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून, तो 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत आहे, या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर हल्ला करून घरातील सामानाची नासधूस केली आहे.

आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबाने माध्यमांसमोर येऊन आरोप फेटाळले आहेत. त्याचा भाऊ बबलू शिंदे याने आपल्या भावावरचे आरोप खोटे असल्याचे सांगत, संपूर्ण प्रकरण हे रचलेले असल्याचा दावा केला आहे.
"माझा भाऊ निर्दोष आहे, परत चौकशी करा"बबलू शिंदेच्या मते, अक्षय शिंदे आणि त्यांचे कुटुंब त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते, आणि केवळ 15 दिवसापूर्वीच अक्षयने नोकरी स्वीकारली होती. जर त्याने असं काही केलं असत, तर तो पुन्हा शाळेत कामाला आला नसता. "सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर मुलींची जबाबदारी कशी येऊ शकते?" असा सवाल बबलूने उपस्थित केला.

Badlapur Case Hearing: प्रचंड निष्काळजीपणा! अद्याप दुसऱ्या चिमुकलीचा जबाब का घेतला गेला नाही? कोर्टाने पोलिसांना झापलं

त्याने आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की, मुलींना स्वच्छतागृहात घेऊन जाण्यासाठी तिथे तीन महिला सेविका होत्या, मग अशा परिस्थितीत माझ्या भावावर हे आरोप कसे काय सिद्ध होऊ शकतात? बबलूच्या मते, हा संपूर्ण प्रकार

रचलेला आहे आणि मुलींची आणि मेडिकल चाचणीची परत चौकशी करावी अशी मागणी त्यानी केली.
"आम्हाला घराबाहेर काढले, जीव वाचवण्यासाठी पळावे लागले"-

बबलू शिंदेने सांगितले की, या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी घराबाहेर आणि गावाबाहेर काढले. त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला आणि घरातील सर्व मालमत्तेची नासधूस करण्यात आली. "आम्ही आता कुठे आहोत, हे सांगू शकत नाही, पण आम्ही कुठेतरी सुरक्षित स्थळी लपून आहोत," असे बबलूने सांगितले.

त्याने पुढे स्पष्ट केले की, त्याच्या भावाचा मुलींच्या अत्याचारासंबंधी कुठलाही दोष नाही आणि त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीत. "आमची कोणाशी दुष्मनी नाही, पण कोणीतरी आम्हाला फसवत आहे," असे बबलू शिंदेने म्हटले.

या प्रकरणामुळे बदलापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply