
Mumbai : मुंबईल पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून यामधील ५ धरणं काठोकाठ भरली आहेत. सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहचला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसांत जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन १०० टक्क्यांवर पोहचेल. ७ जलाशयांपैकी ५ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. आता मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. या धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत...
मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०५,९४८ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९०.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,७२,९६७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ८१.०४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा ९ टक्क्यांनी वाढला आहे.
|
|
मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -
- अप्पर वैतरणा - ८०.१४ टक्के पाणीसाठा
- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.
- तानसा - ९९.३० टक्के पाणीसाठा.
- मध्य वैतरणा - ९६.०१ टक्के पाणीसाठा
- भातसा - ८७.७९ टक्के पाणीसाठा.
- विहार - १०० टक्के पाणीसाठा.
- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
- सेंट्रल बँकेत २५० हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती: १.२० लाखांपर्यंत पगार, आजच अर्ज करा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

