Mumbai News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी दुपारी दोन तास वाहतूक ब्लॉक

Mumbai News : यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवार, २३ जानेवारी रोजी दुपारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या द्रुतगती महामार्गावर दुपारी १२ ते २ दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किलोमीटर ५५ वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून मार्गस्थ करण्यात येणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस खोपोली एक्झिट किलोमीटर ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबईच्या मार्गावर जातील.

Maratha Reservation : मराठा आरक्षण पदयात्रा आज पुण्यात धडकणार; पोलिसांनी वाहतुकीचे मार्गच बदलले

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड-अवजड वाहने ही खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किलोमीटर ३२.५०० येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबईच्या रस्त्यावर मार्गस्थ होतील. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ होतील. मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने किलोमीटर ५४.९०० येथील कुसगाव टोल नाका येथून वळवून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून पुणे बाजूकडे वळविण्यात येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply