Khopoli Accident : कोंबड्यांनी भरलेली टेम्पो ट्रकला धडकली, मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात; दोन्ही वाहनं जळून खाक

Mumbai  : राज्यात गुन्हेगारीसह अपघाताचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. याचदरम्यान, नवी मुंबईतील मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोलीजवळ कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. जखमी झालेल्या व्यक्तीला एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेनंतर देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, खोपोली नगर पालिका फायर ब्रिगेड आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केले. अपघात शेवटच्या लेनवर झाल्यामुळे वाहतुकीला अडचण आली नाही आणि अपघातातील वाहने बाजूला काढून महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Pooja Khedkar : खेडकर दाम्पत्याच्या बंगल्याची झडती; धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल, काडतुसे जप्त

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसचा मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. रात्री उशिरा ही बस या मार्गावरुन जात असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बसमध्ये बसलेल्या ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा मृत्यू झाला. तर ४० भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात आली होती.

एक्सप्रेसवेवर रात्री बसला ट्रॅक्टरने मागून धडक दिली. त्यामुळे बस दरीत कोसळली. आषाढी एकादशीच्या दिवशीच पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांवर मात्र काळाने घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसला दरीतून काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री १ च्या सुमारास मुंबई-पुणे भाविकांच्या बसला ट्रॅक्टरने धडक दिल्याने हा अपघात झाला. बसमध्ये असलेल्या ५४ भाविकांपैकी ४२ भाविकांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले तर तीन रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply