Today Weather Update : नागरिकांनो काळजी घ्या! आज सूर्यदेव आग ओकणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट

Mumbai : राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून विदर्भातील अकोला येथे काल गुरुवारी उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात देखील उन्हाचा चटका वाढला असून सोलापुरात सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तापामान नोंदवलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा पारा पुन्हा चढणार आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात तापमान चाळीशी पारच राहणार आहे. साताऱ्यात काल गुरुवारी ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुढील २४ तासात कमाल तापमान ४१ अंश तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यातील तापमान ४१ अंशावर गेलं असून हवामान विभागानं नागरिकांना दक्षतेचे आवाहन केलं आहे. मागील २४ तासांमध्ये ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासात कमाल तापमान ४० तर किमान २० अंश सेल्सिअस राहील.

सांगली जिल्हामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पुढील २४ तासात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहणार आहे. तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतकं असणार आहे. आकाश निरभ्र राहणार असून वाढत्या उष्णतेमुळे पिकांची काळजी घेण्याचं देखील आवाहन केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात अंशतः घट दिसून येते. कमाल तापमान ३८ अंश तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतकं राहील. मागील २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात ३९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात पारा सतत वाढतच असून कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. वाढत्या उष्णतेने फळबागांवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना पिकांची दक्षता घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून मध्य महाराष्ट्र कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply