
Mumbai : मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना कचरा शुल्क लावण्याचे ठरवले असून १०० रुपये ते ७५०० रुपये शुल्क वसूल आकारण्यात येणार आहे. निवासी इमारतींसह हॉटेल, सभागृह, लग्नाचे हॉल, दवाखाने, वसतिगृहे अशा सगळ्याच आस्थापनांना हे शुल्क लावले जाणार आहे. अंतिमत: हे शुल्क सर्व सामान्यांच्या खिशातूनच जाणार हे उघड आहे.
मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क लावण्याची तयारी घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुरू केली आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि घन कचऱ्याचे वाढते प्रमाण यामुळे मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यात येणार आहे. घराघरातून, कार्यालयातून, इमारतीतून कचरा संकलन करण्याबाबतचे हे शुल्क आहे.
मुंबईकराच्या मालमत्ता करातून हे शुल्क वसूल केले जाणार आहे. त्यामुळे त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहेच. पण हॉटेल, दवाखाने, कार्यालये, सभागृह अशा इतर आस्थापना यांना मोठे शुल्क लावल्यामुळे त्याचा भारही अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांवरच येणार आहे.
असे आहे शुल्क
५० चौरस मीटरपर्यंतची घरे (बांधलेले क्षेत्र) – १०० रुपये
५० चौरस मीटरपेक्षा जास्त घरे. ३०० चौरस मीटरपर्यंतचे बांधलेले क्षेत्र – ५०० रुपये
३०० चौरस मीटर जास्त बांधकाम क्षेत्रफळ असलेली घरे – १००० रुपये
व्यावसायिक कार्यालये, सरकारी कार्यालये – ७५० रुपये
दुकाने, जेवणाची ठिकाणे – १०० रुपये
वसतिगृह – ७५०
हॉटेल (अतारांकित) – १५०० रुपये
हॉटेल (३ तारांकित) – २५०० रुपये
हॉटेल (३ तारांकितपेक्षा जास्त) – ७५०० रुपये
दवाखाना – १०० रुपये
३००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले सभागृह, विवाह सभागृह – ७५०० रुपये
कचऱ्याचे नियोजन
मुंबईत दरदिवशी सुमारे ६५००मेट्रीक टन कचरा तयार होतो.
दररोज वाहनांच्या सुमारे साडेनऊशे फेऱ्या करून कचरा कांजूर व देवनार येथील कचराभूमीवर नेला जातो. मात्र या कचराभूमीची क्षमता संपत आली असून तिथे साठलेले कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी विविध प्रकल्प राबवणे ही भविष्यातील गरज आहे.
मुंबईची सव्वा कोटी लोकसंख्या आणि दररोज मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांची सुमारे ५० लाखापर्यंतची चललोकसंख्या आहे. या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभाग करीत असतो.
पालिकेचे कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी असे मिळून सुमारे ४४ हजार कामगार तीन पाळ्यांमध्ये या विभागात काम करतात.
मुंबईकराना आपल्या सूचना नोंदवण्याची संधी
bmc.swmbyelaws2025@gmail.com या ईमेलवर किंवा घनकचरा व्यवस्थापन मुख्य कार्यालयात लेखी सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ज्यांना लेखी स्वरूपात सूचना अथवा हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (शासकीय व सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता) सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत – प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांचे कार्यालय, तिसरा मजला, महानगरपालिका खटाव मंडई इमारत, अविष्कार इमारतीसमोर, स्लेटर रोड, ग्रँट रोड (पश्चिम), मुंबई-४००००७ या कार्यालयीन पत्त्यावर सूचना / हरकती पाठवता येणार आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


