Mumbai Crime: पुण्याच्या आयटी इंजिनिअर तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार, आधी हॉटेलमध्ये नंतर कारमध्ये...

Mumbai : मुंबईमध्ये पुण्याच्या आयटी इंजिनिअर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन ४ जणांनी सामूहिक बलात्कार केला. कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये आणि कारमध्ये ही घटना घडली. आरोपींनी तरुणाला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये आणि दोन आयफोन उकाळले. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची कर्नाटकची आहे. ती पुण्यातील एका कंपनीमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून काम करते. या तरुणीची २०११ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मुंबईच्या कांदीवलीमध्ये राहणाऱ्या हरसल्ला खान या तरुणासोबत ओळख झाली. सुरूवातीला मैत्री आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हरसल्ला खानने पीडित तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिला मुंबईत भेटण्यासाठी बोलावले.

ठरल्याप्रमाणे पीडित तरुणी या तरुणाला भेटण्यासाठी मुंबईत आली. कांदिवलीमधील एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर हरसल्ला खानने तिला शीतपेयात गुंगीच्या गोळ्या मिक्स करून दिल्या. तरुणीला गुंगी आल्यानंतर हरसल्लाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हरसल्ला तिला कारमधून पुण्याला घेऊन गेला. पुण्याला जात असताना देखील त्याने तरुणीवर कारमध्ये बलात्कार केला. त्यानंतर त्याने आपल्या ३ मित्रांना बोलावून घेतलं. या चौघांनी मिळून तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. यामधील काही आरोपींनी तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार देखील केला.

तसेच आरोपींनी पीडीत तरुणीचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपींनी तिच्याकडून ३० लाख रुपये आणि २ आयफोन घेतले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून काळेपडळ पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कांदिवली पोलिस करत आहेत. चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply