
Mumbai : नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रस्त्यावरील बंदोबस्तासह समाज माध्यमांवरही पोलीस लक्ष ठेऊन आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने समाज माध्यांवरील १४० आक्षेपार्ह व प्रक्षोभक पोस्ट शोधल्या असून त्या हटवण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
नागपुरातील ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी रात्रीपासून संचारबंदी जाहीर केली. बुधवारी देखील संचारबंदी कायम असून दंगलीतील संशयितांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यभरातील सर्व पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजकंटक हिंसक घटनांना खतपाणी घालण्याची शक्यता असल्यामुळे त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. अशा समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समाज माध्यमांवरही महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेऊन आहे.
समाज माध्यमांवरूनही आक्षेपार्ह पोस्ट व प्रक्षोभक पोस्टद्वारे हिंसक घटनांना खतपाणी घालण्याची शक्यता लक्षात घेता समाज माध्यमांवरही पोलिसांना लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अंतर्गत फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नागपूर पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र सायबर विभागाने समाज माध्यमांवरून १४० प्रक्षोभक पोस्ट शोधून काढल्या असून त्या तात्काळ हटवण्याबाबत संबंधित कंपन्यांशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. तसेच संबंधित समाज माध्यम खाते कोण हाताळत आहे, याबाबाबची माहितीही मागवण्यात आली आहे.
|
Solapur : सोलापूर जिल्हा परिषदेचा ४५ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प |
या पोस्टबाबत संबंधित व्यक्तींविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र सायबर विभागही समाज माध्यमांवर नियमित लक्ष ठेऊन असतात. दोन वर्षांमध्ये १० हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यात आल्या असून त्या हटवण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यात ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्युबवरील चित्रफिती यांचा समावेश आहे.
नागपूर येथे सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर अजूनही नागपुरातील अनेक भागांत तणावपूर्ण शांतता आहे. संचारबंदी बुधवारी देखील कायम होती. राज्यातील इतर भागांतही त्याचे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिस आणि प्रशासन सतर्क आहे. दरम्यान दंगलीतील सहभागींचा शोध घेऊन चौकशी आणि अटकेचे सत्र पोलिसांनी सुरू केले आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे नागपुरातील महाल, गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा आणि चादर जाळण्यात आली. त्यानंतर मध्य नागपुरात दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

