Golden jackals in Navi Mumbai : नवी मुंबईच्या गजबजलेल्या भागात दुर्मिळ सोनेरी कोल्हे; फोटो बघून विश्वासच बसणार नाही

New Mumbai : मागील काही दिवसांत मुंबईतील मानखुर्दमधील खाडी किनारी भागात सोनेरी कोल्हे आढळले होते. या सोनेरी कोल्ह्यांचा नवी मुंबईतही वावर वाढला आहे. नवी मुंबईच्या खारघरमध्ये सोनेरे कोल्हे आढळले आहेत. खारघरमधील खाडी किनारी भागात सोनेरी कोल्ह्यांचा वावर वाढलाय. दोन दुर्मिळ सोनेरी कोल्ह्यांचे फोटो समोर आले आहेत.

नवी मुंबईच्या खारघर शहरालगतच्या खाडी किनारी भागात मागील काही महिन्यात सोनेरी कोल्ह्यांचा मुक्त संचार वाढला आहे. खारघरमधील वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजूस खाडी किनारी भागात दोन सोनेरी कोल्हे आढळले. सोनेरी कोल्हे डुक्कर खातानाचा फोटो निर्दर्शनास आले आहे. पक्षी आणि प्राणीमित्र तरंग सरीन यांनी सोनेरी कोल्ह्यांचा फोटो कॅमेऱ्यात टिपला आहे. अवघ्या दोन मिनिटात दोन्ही कोल्हे त्या मृत डुक्कराला खारफुटीत घेऊन गेले. काही वेळेनंतर दोन्ही सोनेरी कोल्हे गायब झाल्याचे तरंग यांनी सांगितले.

नवी मुंबईत कोल्ह्यांचा खुलेआम वावर

काही दिवसांपूर्वी खारघरच्या सेंट्रल पार्कमध्येही कोल्ह्यांचा खुलेआम वावर पाहायला मिळाला होता. भक्ष्यांच्या शोधात असलेले कोल्हे रस्ते आणि खाडीकिनारी भागात आढळलेले होते. त्यानंतर कोल्हे सेंट्रल पार्कात आढळले होते. कोल्ह्यांचा वावर वाढल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.

Valentine : व्हॅलेंटाईन साजरा करायला प्रेयसीच्या घरी गेला, कुटुंबानं हात-पाय बांधून बेदम चोपलं, तरूणाचा मृत्यू

गेल्या तीन-चार वर्षांपासून नवी मुंबईतील सेंट्रल पार्कमध्ये पाणथळ, खाडीकिनारा भागात खुलेआम वाढला आहे. काही दिवसांपूर्वी खारखरमधील सेक्टर १५ मधील रस्त्यावर सोनेरी कोल्हा मृतावस्थेत आढळला होता. मागील काही वर्षांत देखील कोल्ह्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले होते.

सोनेरी कोल्हे युरोप, आफ्रिका, आशियाच्या काही भागात आढळतात. कांदळवन क्षेत्र हे सोनेरी कोल्ह्यांचे अधिवासासाठी मुख्य स्थान असल्याचे प्राणी अभ्यासकांकडून सांगण्यात येते. सोनेरी कोल्हा हा सस्तन प्राणी आहे. याच सोनेरी कोल्ह्यांचे मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरात वारंवार दर्शन होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply