Palghar-Nashik Highway : प्रवास होणार झटपट, नाशिक ते पालघर फक्त एका तासात; कसा आहे १८०२० कोटींचा गेमचेंजर प्रकल्प?

Palghar-Nashik Highway : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-दिल्ली महामार्ग महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्वाचे प्रकल्प मानले जातात. या दोन्ही प्रकल्पांचे मोठ्या वेगाने कामे सुरु आहेत. या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरु असताना राज्यात १८०२० कोटींचा नाशिक ते पालघर महामार्ग उभारला जात आहे. या मेगा प्रोजेक्टमुळे नाशिक ते पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा ४ तासांचा प्रवास आता अवघ्या एका तासात होणार आहे.

वाढवण बंदर आणि नाशिक जिल्ह्याचं अंतर कमी करण्यासाठी द्रुतगती महामार्ग बांधला जात असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा ११८ किमी लांबीचा महामार्ग बांधला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. हाच महामार्ग पुढे मुंबई-सुरत समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. यानंतर चारोटी-इगतपुरीदरम्यान एकूण ८५.३८ किमी लांबी मार्गापर्यंत पुढे जाणार आहे.

मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा महामार्ग आहे. हा एकूण ७०० किलोमीटरपेक्षा मोठा आहे. हा महामार्ग मुंबई ते नागपूरला जोडला जातो. समृद्धी महामार्ग हा राज्यातील १० जिल्ह्यांना जोडला जातो. तसेच ३९० गावातून हा महामार्ग जातो. दुसरीकडे दिल्ली-मुंबई महामार्गामुळे २४ तासांचा प्रवास १२ तासांत पूर्ण होणार आहे. हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे ८ पदरी असल्याची माहिती मिळत आहे .

Parali News : माधव जाधव मारहाण प्रकरण; तीन महिन्यांनंतर गुन्हा नोंद, पोलीस गार्डचा नोंदविला जबाब

दिल्ली-मुंबई महामार्गावरच मुंबई-वडोदरा-जेएनपीटी बंदराला जोडणारा देखील मार्ग आहे. वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे आणि दुसऱ्या बाजूने सध्याच्या नाशिक महामार्गासाठी एकूण ६ किमी लांबीचा जोडरस्ता बांधला जातोय. समृद्धी महामार्ग संपल्यावर जोड रस्त्यावरून वसई,विरार,डहाणू, सूरतमार्ग वडोदरा आणि तिथून हा मार्ग मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडला जाणार आहे. दोन्ही महामार्ग वाढवण बंदराला जोडला जाणार आहेत.

नाशिकला पालघर वाढवण बंदराशी जोडण्यासाठी नवा महामार्ग बांधला जात आहे. पालघर आणि नाशिकमधील एकूण ४२ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. पालघरमधील जव्हार आणि मोखाडा तसेच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीतून प्रस्तावित महामार्ग जाणार आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक, आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच रोजगाराच्याही सधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्रालाही फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी १८०२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply