Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना राज्यातील मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतदान केल्याचेही म्हटले आहे.
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या लढाईत आज (शनिवार) निकालाच्या दिवशी सध्यातरी सुरवातीच्या कलानुसार भाजपप्रणित महायुती सत्ता स्थापनेजवळ गेल्याचे दिसत आहे. सुरवातीच्या कलानुसार महायुती तब्बल २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेसप्रणत महाविकास आघाडीची मोठी निराशा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजप सर्वांत मोठा पक्ष होत असल्याचे दिसत आहे, सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०० चा आकडा पार केला आहे. सुरवातीच्या कलानुसार दुपारी बारापर्यंत २८८ पेकी महायुती २२१ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ५० जागी आघाडीवर आहे.

Maharashtra Assembly Election : आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे ?


महायुतीत भाजप १२७, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३८ हे पक्ष सध्या एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत. तर, महाविक्कास आघाडी ५० जागांवर आघाडीवर असून, यामध्ये काँग्रेस १८, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १५ जागांवर आघाडीवर आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, की मतदारांचे सर्वप्रथम आभार, महायुतीला मोठे यश दिले आहे. लाडक्या बहिणींनी मतदान केले, लाडके भाऊ, लाडके शेतकऱ्यांनी आम्हाला भरभरून मतदान केले. गेले दोन वर्षे जे आम्ही काम केले, त्याची पावती आम्हाला मिळाली आहे.

जे काम केले त्याचे पोचपावती जनतेने आम्हाला दिली आहे. पुढील काळात आमची आणखी जबाबदारी वाढली आहे. सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. मतदारांना मी धन्यवाद देतो, की त्यांनी मोठ्या लीडने मला विजयी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply