Maharashtra Assembly Election : आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे ?

Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या निकालात आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपप्रणित महायुतीला सत्ता मिळण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या कलानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबाबत चर्चाना सुरवात झाली असून, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत आहेत.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या लढाईत आज (शनिवार) निकालाच्या दिवशी सध्यातरी सुरवातीच्या कलानुसार भाजपप्रणित बृहायुती सत्ता स्थापनेजवळ गेल्याचे दिसत आहे. सुरवातीच्या कलानुसार महायुती तब्बल २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर, कॉग्रेसप्रणित महाविकास आघाडीची मोठी निराशा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजप सर्वांत मोठा पक्ष होत असल्याचे दिसत आहे, सलग तिसन्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २०० चा आकडा पार केला आहे. सुरवातीच्या कलानुसार दुपारी बारापर्यंत २८८ पेकी महायुती २२१ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ५० जागी आघाडीवर आहे.

तर महाविकास आघाडी ५० जागी आघाडीवर आहे.

महायुतीत भाजप १२७, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३८ हे पक्ष सध्या एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत. तर, महाविकास आघाडी ५० जागांवर आघाडीवर असून, यामध्ये काँग्रेस १८, शिवसेना

या कलानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील असे म्हटले आहे. तर, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा दावा केला आहे.

यामुळे सध्यातरी या दोन्ही नेत्यांमध्येच स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या लढाईत आज (शनिवार) निकालाच्या दिवशी सध्यातरी सुरवातीच्या कलानुसार भाजपप्रणित महायुती सत्ता स्थापनेजवळ गेल्याचे दिसत आहे. सुरवातीच्या कलानुसार महायुती तब्बल २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीची मोठी निराशा झाल्याचे पाहायला मिळत आहे
.भाजप सर्वांत मोठा पक्ष होत असल्याचे दिसत आहे, सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०० चा आकडा पार केला आहे. सुरवातीच्या कलानुसार दुपारी बारापर्यंत २८८ पेकी महायुती २२१ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ५० जागी आघाडीवर आहे.

महायुतीत भाजप १२७, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३८ हे पक्ष सध्या एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत. तर, महाविकास आघाडी ५० जागांवर आघाडीवर असून, यामध्ये कॉंग्रेस १८, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १५ जागांवर आघाडीवर आहे.
या कलानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील असे म्हटले आहे. तर, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा दावा केला आहे. यामुळे सध्यातरी या दोन्ही नेत्यांमध्येच स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply